vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्य प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्य प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भारत सरकारच्या पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्था (सिपेट) यांच्यावतीने प्लास्टीक प्रोसेसिंग मशिन ऑपरेटर हा चार महिने कालावधीचा विनामूल्य अभ्यासक्रम राबविण्यात येतो. या अभ्यासक्रमास इच्छुकांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हा अभ्यासक्रम पूर्णतः निःशुल्क असून राज्यातील रहिवासी असलेल्या १८ ते ३० वर्षे वयोगटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय , आर्थिक मागासलेल्या गटातील युवक युवतींसाठी हा चार महिने कालावधीचा अभ्यासक्रम विनामूल्य आहे. या अभ्यासक्रमाच्या ५५ जागा असून १० वी उत्तीर्ण किंवा त्याच क्षेत्रातील अनुभव असलेल्या इयत्ता ८ वी पर्यंत शिक्षण झालेले उमेदवारही अर्ज करु शकतील.अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर आहे. प्रवेश प्रक्रिया दि.२४ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. अधिक माहितीसाठी ९३२५६८७९१०/ ९६०१३६४५५०/९१४५६७५५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापक सिपेट, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

गंगापूर धरण परिसरात २३ जानेवारी रोजी भारतीय वायू दलातर्फे एअर शोचे आयोजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

vishwatmaklokswamivarta

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन…

कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा-वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची मागणी…

vishwatmaklokswamivarta

कृषी यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण; कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

vishwatmaklokswamivarta

लेख – १ जुलै : राज्य कृषी दिन-हरित क्रांतीचे जनक – वसंतराव नाईक

जिल्हा ‘हरित ऊर्जा’ युक्त करण्यासाठ,विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta