vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन…

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :- “बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन (Biofloc) हे आधुनिक तंत्रज्ञान असून हे किफायतशीर (Profitable) होण्यासाठी टैंक उभारल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापुर्वी पुर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह माशांचे आरोग्य व्यवस्थापन शास्रोक्त पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थापन देखिल महत्वाचे आहे बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्याची बाब विचारात घेऊन मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांचेकडून Training workshop on “Biofloc Aquaculture”- “बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत प्रशिक्षण कार्यशाळा २० ते २१ मार्च २०२५ रोजी कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजीत करण्यात आली आहे.

 या कार्यशाळेमध्ये शास्रोक्त बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत महत्वाची माहिती व प्रात्यक्षिक समजावून घेण्याच्या दृष्टीने शास्रज्ञ, प्राध्यापक, तज्ञ अधिकारी व अनुभवी बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धक यांचेमार्फत सविस्तर मार्गदर्शन तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे “सदर प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, बीड, जालना व परभणी या जिल्ह्यामध्ये बायोफ्लॉक प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा (PMMSY) अंतर्गत Biofloc culture योजनेतील सर्व बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारकांनी तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय बिजय शिखरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३७५८८२४, ९८८१६००९५१ व ८२०८४१३०११ या क्रमाकांवर संपर्क करावा.

*****

संबंधित पोस्ट

बारामती तालुक्यात अतिवृष्टीमुळे काटेवाडी परिसरातून ७ आणि शहरातून १ अशा ८ नागरिकांची सुखरूप सुटका. नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर. 

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

शैक्षणिक कामाच्या दाखल्यांसाठी जवळच्या सेवा केंद्रात अर्ज सादर करा

सुरक्षा मंत्रालायची पत्रकार परिषद,कमोडोर रघु आर नायर, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांची भारत-पाकिस्तान संघर्षविराम करारानंतर पत्रकार परिषद 

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगडमधील रायगड भरधाव बस पुलाला धडकली, 26 जण जखमी; रायगड जिल्ह्यातील घटना…

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

vishwatmaklokswamivarta