vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

बुलढाणा प्रतिनिधी: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘अवयवदान पंधरवडा’ साजरा करण्यात येत असून, सोमवारी (दि. ३) जिल्हा शासकीय रुग्णालयात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावर्षी “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” या संकल्पनेवर आधारित विविध जनजागृती उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहेत.

अवयवदानाबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यासंदर्भातील गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करणे तसेच अधिकाधिक नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने समाजहिताच्या या कार्यात सहभागी होऊन अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रवी शिंदे, डॉ. कल्पना इंगळे, डॉ. भिलावेकर, नोडल अधिकारी अविनाश चिंचोले, नेत्रदान समुपदेशक योगेश सिरसाट, डॉ. अमोल उगले, सौरभ हिवाळे, डॉ. देशमुख, स्टाफ नर्स, जिल्हा माहिती, शिक्षण व माध्यम अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक व धार्मिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती रॅली, शपथविधी, व्याख्याने, चर्चासत्रे, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा, आरोग्य शिक्षण, समाजमाध्यमांद्वारे जनजागृती तसेच अवयवदानाविषयी यशोगाथा आणि अनुभव कथन यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

याशिवाय, अवयवदानासाठी कार्यरत संस्थांच्या समन्वयातून नागरिकांना अवयवदानाची प्रक्रिया, त्याचे महत्त्व आणि कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच सामाजिक संस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

रेशन न घेतल्यास रेशनकार्ड होणार रद्द

पालक सचिव डॉ. गोविंदराज यांचा रायगड दौरा  जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेतला भेट..

vishwatmaklokswamivarta

मिरज प्रकल्पांतर्गत मानमोडी व अंकली गावातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी 16 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये मोबाइल मेडिकल युनिट्सद्वारे मोफत आरोग्य सेवा सुरू सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत दोन लाख नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्यसेवा…

रेवसा आश्रमशाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहिम

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन