vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनगणना 2027 साठी फील्ड ट्रेनर प्रशिक्षणास प्रारंभ- निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे

जनगणना 2027 साठी फील्ड ट्रेनर प्रशिक्षणास प्रारंभ- निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे

        सांगली, प्रतिनिधी : भारत सरकारकडून आगामी जनगणना 2027 साठी व्यापक तयारी सुरू करण्यात आली असून, सांगली जिल्ह्यातील जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत घरयादी व घरगणनेबाबत फील्ड ट्रेनर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. दि. 06 ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत दोन सत्रांमध्ये हे प्रशिक्षण पार पडणार असल्याचे जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

            सांगली जिल्ह्याकरीता नियुक्त 70 फील्ड ट्रेनर यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे तीन दिवसीय प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणासाठी विटा-खानापूर निवासी नायब तहसीलदार विजय साळुंखे व कडेगाव निवासी नायब तहसीलदार महेश अनारसे हे मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. प्रशिक्षित फील्ड ट्रेनर प्रत्येक चार्ज स्तरावर नियुक्त केलेले प्रगणक व पर्यवेक्षक यांना घरयादी व घरगणनाबाबत प्रशिक्षण देणार आहेत.

            जनगणना 2027 ही दोन टप्प्यांमध्ये शासनाकडून राबविली जाणार असून, पहिला टप्पा हर घरयादी व घरगणनेचा असून तो 16 मे 2026 ते 14 जून 2026 दरम्यान होणार आहे. या कालावधीत प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या गावातील भागाला भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना करतील. यावेळी शासनाने निश्चित केलेल्या 34 प्रश्नांद्वारे घरातील प्रमुख अथवा उपस्थित व्यक्तींकडून माहिती संकलित करण्यात येईल व ती HLO अॅपद्वारे जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाईल.

            जनगणनेचा दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष जनगणना असून तो 1 फेब्रुवारी 2027 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत पार पडणार आहे. जनगणनेची ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार असून नागरिकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

            तसेच, प्रत्यक्ष क्षेत्रकार्य सुरू होण्यापूर्वी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत se.census.gov.in या संकेतस्थळावर व्यक्ती स्वत: व आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकणार आहेत. नागरिकांनी se.census.gov.in या पोर्टलचा वापर करून आपली नोंदणी स्वतः करावी व जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.00000

संबंधित पोस्ट

१०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा मिळणार : रोहयो मंत्री भरत गोगावलेमहाड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भुमीपुजन…

राममूर्ती ता.जालना येथील अनेक शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!

दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी १९२० शाळांमध्ये पालक सभा चांगले नागरिक घडविण्यासाठी संस्कार आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन*

सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी

टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्यादृष्टीने दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न