vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

अमरावती, प्रतिनिधी : सामान्य प्रशासन विभागाच्या 30 एप्रिल 2026 च्या अधिसूचनेनुसार अरुण किशोर डोंगरे यांची अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी श्री. डोंगरे यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

नवीन प्रशासन भवन, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात झालेल्या शपथग्रहण सोहळ्यामध्ये माजी आयुक्त दिलीप शिंदे यांनी नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल नवनियुक्त आयुक्त अरुण डोंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले

या शपथविधी सोहळ्याला विधानसभा सदस्य करण देवतळे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, कोकण विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना- २०२५’ चे उद्घाटन व नवीन इलेक्ट्रिक बस लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणव जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त* *जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून शिबीरांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अपघाताची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी- उपमुख्यमंत्री अजित पवारअपघातातील जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत, उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025 चे आयोजन उद्योजक,नवउद्योजक, गुंतवणूकदारांनी उपस्थित राहावे

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन