vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना २०२६ चा ‘शिव सन्मान पुरस्कार जाहीर

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना २०२६ चा ‘शिव सन्मान पुरस्कार जाहीर

रायगड (रवींद्र मालुसरे ) : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शिव सन्मान पुरस्कार २०२६” हा महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक मंत्री, ज्येष्ठ लोकनेते आणि शिवभक्त मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह दादर येथे आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवराज्याभिषेक सोहळ्याची परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि शिवकालीन स्मृतींचे जतन-संवर्धन यासाठी भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाला हा त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून समितीच्या वतीने देण्यात येतो. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी चांदीची पालखी अर्पण करून या ऐतिहासिक सोहळ्याच्या वैभवात मोलाची भर घातली. तसेच श्रीक्षेत्र प्रतापगडावरील श्री भवानी मातेला चांदीचे छत्र अर्पण करून त्यांनी शिवभक्ती, श्रद्धा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

 

इतिहास संवर्धनाच्या दृष्टीने त्यांच्या कार्यातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे, जी अनेक वर्षे लंडनमध्ये जतन करण्यात आली होती, ती महाराष्ट्रात प्रथमच प्रदर्शित होण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका. या ऐतिहासिक उपक्रमामुळे लाखो शिवप्रेमींना या ऐतिहासिक ठेव्याचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आणि शिवकालीन इतिहासाबद्दल जनमानसात नव्याने अभिमानाची भावना निर्माण झाली.

 

याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन हा इंग्रजी दिनांकानुसार नव्हे, तर हिंदू पंचांगातील ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसारच शासनामार्फत अधिकृतरीत्या साजरा करण्यात यावा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयासाठी त्यांनी सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक पाठपुरावा केला. शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखत या विषयात त्यांनी शासनस्तरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

शिवकार्य, इतिहास संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वैभव वृद्धिंगत करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा जागर करण्यासाठी दिलेल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने त्यांना ‘शिव सन्मान पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवर, इतिहास अभ्यासक, दुर्गप्रेमी, शिवभक्त आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, राज्यभरातील शिवप्रेमींनी या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

१५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या सूचना  • जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब

मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ निमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन -कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी होणार सहभागी

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे- मुख्य सचिव सुजाता सौनिक,मदतीबातची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मिडिया व वृत्तपत्रांत ठळकपणे द्यावी शासन-प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

विशेष वृत्त..वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित१५ एप्रिलपर्यंत ४० ठिकाणांचे अलर्ट्स मिळणार