vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे- मुख्य सचिव सुजाता सौनिक,मदतीबातची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मिडिया व वृत्तपत्रांत ठळकपणे द्यावी शासन-प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे- मुख्य सचिव सुजाता सौनिक,मदतीबातची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मिडिया व वृत्तपत्रांत ठळकपणे द्यावी शासन-प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा

 

मुंबई, प्रति निधी: आपत्ती काळात राज्य शासनामार्फत मदत व बचाव कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येते. आपत्तीमध्ये शासन व प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता नागरी आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणाऱ्या यंत्रणांनी या काळात सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टी, आपत्ती व व्यवस्थापन संदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके आदी उपस्थित होते.आवश्यक ठिकाणी सावधानतेची चिन्हे लावावीत मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, आपत्ती काळात कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत काम करणाऱ्या यंत्रणांनी घ्यावी. यासाठी अपूर्ण कामे, रिटेनिंग वॉल्स, नाल्यांचे काठ आणि इतर धोका दायक ठिकाणांची नियमित तपासणी व पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी सावधानतेची चिन्हे लावावीत आणि नागरिकांना त्याबाबत माहिती द्यावी. आपत्ती काळात रेल्वे स्थानक, वाहतूक व्यवस्था, जलपुरवठा केंद्रे यासारख्या ठिकाणी धोकादायक स्थिती जाणवल्यास या सेवा तात्पुरत्या थांबविण्यात याव्यात.यंत्रणांनी वस्तुनिष्ठ माहिती द्यावी,आपत्तीत काम करणाऱ्यांना आवश्यक साधनसामग्री दिली जावी. आपत्ती काळात घ्यावयाची दक्षता याबाबत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सूचना एकाच ठिकाणाहून दिल्या जाव्यात. आपत्तीमध्ये दिल्या जात असलेल्या मदतीची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वृत्तपत्रे व अन्य माध्यमातून नागरिकांना दिली जावी. याबरोबरच आपत्तीमधील घटनांची वस्तुनिष्ठ माहिती देण्यात यावी. पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करावी. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सजगता दाखवावी, असे निर्देशही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी दिले

संबंधित पोस्ट

रस्ता सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे..!मिशन मोडवर काम करावे  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पालकांच्या आत्मविश्वासाची जोडही आवश्यक – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके आदिवासी आश्रमशाळांमध्ये आता डिजीटल सुविधांची भर

श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या मार्गदर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकलशारोहण समारंभ

vishwatmaklokswamivarta

महिला सशक्तीकरण,खाकीतील माणुसकी आणि कर्तृत्वाचा ‘भरोसा’-API तेजश्री शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा

जिल्ह्यात 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश*