vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत जीवनाची दिशा देतात –पालकमंत्री जयकुमार रावल दोंडाईचा येथे २७ आदर्श शिक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत जीवनाची दिशा देतात –पालकमंत्री जयकुमार रावल-दोंडाईचा येथे २७ आदर्श शिक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव…

धुळे, प्रतिनिधी :शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जीवनाला योग्य दिशा देतात. आई-वडिलांनंतर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून शाळांमधून चांगल्या विद्यार्थ्यांसोबतच संवेदनशील, जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहरातील विविध शाळांमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या २७ शिक्षकांचा पालकमंत्री रावल यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री रावल यांनी माजी राष्ट्रपती तथा थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिन हा केवळ पुरस्कार प्रदान करण्याचा दिवस नसून भावी पिढी आणि पर्यायाने समाज घडविणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.

दोंडाईचा शहरातील प्रत्येक शाळेतून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका शिक्षकाची निवड करून त्यांचा गौरव करण्याचा नगरपरिषदेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नमूद करून पालकमंत्री रावल म्हणाले की, एका शिक्षकाचा गौरव हा संपूर्ण शिक्षकवर्गाच्या कार्याचा सन्मान आहे. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगाने वाढत असला, तरी विद्यार्थ्यांना संस्कार, मूल्ये आणि योग्य दिशा देण्यात शिक्षकांची भूमिका कायमच महत्त्वपूर्ण राहणार आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालिका आणि शिक्षण विभागाने समन्वयाने काम करावे. शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव असलेली आणि जबाबदार पिढी घडविणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट असले पाहिजे, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना हा सन्मान त्यांना भविष्यात आणखी उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२७ आदर्श शिक्षकांचा गौरवयावेळी प्रदीप शिवदास पाटील, शेख साजिद दाऊद खाटीक, मनीषा श्रीराम पाटील, संजय सुकनंदन चौधरी, हबीबु रेहमान हुसेन अहमद अन्सारी, संदीप रामा ईशी, मनीषा मधुकर बंजारा, शेख मुश्ताक शेख कमरुद्दीन, दीपक आधार कोल्हाटी, संगीता पाडवी, शेख तौफिक अहमद शेख रफिक, प्रदीप नामदेव सूर्यवंशी, भाऊसाहेब गोरेख पाटील, निळकंठ देविदास कुलकर्णी, मनोजकुमार ठाकूर, ललित संतोष कंवर, उर्मिला रविंद्र पाटील, प्रविण दिगंबर माळी, सचिन पाटील, सुंदरी विघ्नेश अबीरामी, सुचिता भट्ट पवार, फरहाना तसवर पिंजारी, जयसिंग हिम्मतसिंग गिरासे, अशोक खंडू सावंत, सुरेंद्रसिंग दौलतसिंग गिरासे, कोंकेंद्र ताराचंद वाडीले आणि मनीषा तानाजी घुगे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थितीकार्यक्रमास उपनगराध्यक्ष विजय पाटील, शिक्षण सभापती वैशाली कागणे, जितेंद्र गिरासे, प्रवीण महाजन, कृष्णा नगराडे, जितू गिरासे, भैया धनगर, अक्षय चव्हाण, सचिन सोनवणे, संजय रामुडे, निखिल राजपूत, बांधकाम सभापती मुकेश देवरे, माजी नगराध्यक्ष रमेश कुकरेजा, भरत ठाकूर, राकेश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, हितेंद्र महाले यांच्यासह शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करणाऱ्या या उपक्रमामुळे शिक्षकवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

 

०००

संबंधित पोस्ट

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहायक

सेवा वारी’ उपक्रमांतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा  पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी;27 परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू