vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना मुंबईत छत्री वाटप

ज्येष्ठ नागरिकांना मुंबईत छत्री वाटप

मुंबई (रवींद्र मालुसरे ) : ८० टक्के समाजकारण आणि २o टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनाला अनुसरून शाखा क्रमांक २०४ चे उपशाखाप्रमुख श्री राजन मनोहर कोतावडेकर यांच्या माध्यमातून लालबागमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शिवसेना सचिव सुधीर साळवी , प्रभाग क्रमांक २०४ चे नगरसेवक किरण तावडे तसेच समाजसेवक राजेंद्र लांजवळ यांच्या शुभ हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे चिटणीस बाळासाहेब कांबळे, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश पाटील ,सतीश खणकर, किरण वाणी, राजन राणे, राजेंद्र महाडीक, अशोक दातखिले ,उपशाखाप्रमुख विलास कांबळे,विनय शेट्ये,धर्मेंद्र दुबे,आणि शिवसैनिक प्रशांत केळसकर,संदीप तुळसकर ,प्रशांत जानवलकर ,विक्रांत जाधव , शुभम जाधव,सुदर्शन केरकर ,शुभम दुबे, विजय महाड़ीक व महिला आघाडी प्रमुख समृद्धी सोनावणे , इंद्रायणी तेली इत्यादी उपस्थित होते.

====

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती चा महामोर्चा…

vishwatmaklokswamivarta

राममूर्ती ता.जालना येथील अनेक शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!

नव्या मुंबईत विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छता दिंडी सोहळ्यात स्वच्छता व पावसाळी पाण्याच्या संग्रहण संदेशाचा जागर…

वरदविनायक महिला स्वयंसहायता समूह बचतगट,भायमाला,कामार्लेयांची ध्येयाकडे वाटचाल

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण;केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी

राष्ट्रीय लोक अदालत; ९२६ प्रकरणे तडजोडीने निकाली

vishwatmaklokswamivarta