vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांसाठी मदत कक्ष संपर्क क्रमांक जाहीर jo

ठाणे जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांसाठी मदत कक्ष संपर्क क्रमांक जाहीर

ठाण प्रतिनिधी प्रतिनिधी ): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांचा ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ घोषित करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील मतदारांना नाव नोंदणी, दुरुस्ती व इतर तांत्रिक बाबींमध्ये सुलभता आणि मार्गदर्शन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे तसेच जिल्ह्यातील सर्व १९ विधानसभा मतदारसंघांनिहाय विशेष मदत कक्ष (Help Desk) स्थापन करण्यात आले आहेत.

        या संदर्भातील सर्व अधिकृत संपर्क क्रमांक आणि वेळापत्रक निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे

    घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या अंतर्गत ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी जाऊन पडताळणी व भेटी दिल्या जाणार आहेत. त्यानंतर २९ जुलै २०२६ रोजी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल.

 

            मतदारयाद्यांची प्रारूप प्रसिद्धी ५ ऑगस्ट २०२६ रोजी केली जाईल, तर नागरिकांना आपल्या दावे व हरकती दाखल करण्यासाठी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ असा एक महिन्याचा कालावधी दिला जाईल.

 

            प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकतींचा निकाल ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ या नोटीस टप्प्यात लावला जाईल आणि अखेर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

            मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून जारी करण्यात आलेल्या संपर्क क्रमांकांमध्ये, मुख्य निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथील मदत कक्षासाठी ८०९७८६१९५०, ७०३९७६१९५० आणि ८०९७२८५५८९ हे क्रमांक उपलब्ध असतील.

            मतदारसंघनिहाय संपर्कासाठी १३४-भिवंडी ग्रामीण (अ.ज.) करिता ०२५२२-२२१२१५, १३५-शहापूर (अ.ज.) करिता ०२५२७-२७२०६८, १३६-भिवंडी पश्चिमसाठी ८८२८७१५७६७, १३७-भिवंडी पूर्वसाठी ८१०८८३८८६६, १३८-कल्याण पश्चिमसाठी ०२५१-२३२३१३८, आणि १३९-मुरबाडसाठी ९३५९७३४४९३ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

            तसेच १४०-अंबरनाथसाठी ८७६७१७०१८४, १४१-उल्हासनगरसाठी ९४२१८७६८१२/८७६७१२११६५, १४२-कल्याण (पूर्व) साठी ९०२९६६५१५८/९१५२७८७६८०, १४३-डोंबिवलीसाठी ९३२४३४८७७९, १४४-कल्याण ग्रामीणसाठी – 9004576100, १४५-मीरा-भाईंदरसाठी ०२२-२८४५६१०४ आणि १४६-ओवळा-माजीवडा मतदारसंघासाठी ८०९७८७७४७८, ९८९२६७६८२९ किंवा ०२२-२१७३६१३० या क्रमांकांवर मतदारांना मदत मिळेल. याशिवाय १४७-कोपरी पाचपाखाडीसाठी ८६५५९७९७२२, १४८-ठाणे मतदारसंघासाठी ९८२०७७१९१३, १४९-मुंब्रा-कळवासाठी ९५९४७७६१५०, १५०-ऐरोलीसाठी ९३२१०२४३९३ आणि १५१-बेलापूर मतदारसंघासाठी ९८३४६३५९३३ अथवा ९८९२४७९९९२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            त्याचप्रमाणे नागरिकांना थेट संपर्कासाठी जिल्हा निवडणूक शाखा, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे (पश्चिम) ४००६०१ येथे कार्यालयीन वेळेत भेट देता येईल. तसेच अधिक चौकशीसाठी ०२२-२५४५४१४२ हा दूरध्वनी क्रमांक, dydeothane@gmail.com हा ई-मेल आयडी आणि www.thaneelection.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

            सर्व पात्र नागरिकांनी या पुनरीक्षण मोहिमेचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन..

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करा· महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा

विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन*