vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसायस्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन* 

*नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन*

 

      नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘गट-क’ आणि ‘गट – ड’ मध्ये 30 संवर्गात 620 पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची माहिती 27 मार्च 2025 रोजी वर्तमानपत्रांतून तसेच महानगरपालिकेची वेबसाईट व सर्व सोशल मिडिया माध्यमांतून प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

यामध्ये – मूळ जाहिरातीतील अ.क्र.2 – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (गट-क), वेतनश्रेणी:- एस – 14 : 38600 – 122800 या संवर्गाच्या पद संख्येत वाढ झाल्याने जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या या पदांच्या सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये बदल करण्यात येत आहेत.

     मूळ जाहिरातीत प्रसिध्द अटी व तरतुदींमध्ये कोणताही बदल नाही याची संबधितांनी नोंद घ्यावी आणि इच्छुक पात्र उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी व याविषयीची माहिती जाणून घ्यावी आणि अर्ज करावेत असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’चा अनोखा उत्सव,फाईन लाईन आर्ट अकॅडमी’चा उपक्रम; कलाकुसर पाहून दिल्लीकर स्तिमित..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार डॉ.कुमार सप्तर्षी यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्तआमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश..

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ५५६ पुनर्वसन झालेल्याबीडीडी चाळीच्या सदनिकांचे #चावी वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

शासकीय निवासी शाळेसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन..