vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार डॉ.कुमार सप्तर्षी यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,डॉ.कुमार सप्तर्षी यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली..

मुंबई प्रतिनिधी  ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते, लेखक आणि तरुण पिढीचे मार्गदर्शक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे सच्चा गांधीवादी व समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. सप्तर्षी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित, शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी समर्पित केले. युवक क्रांती दलाच्या (युक्रांद) माध्यमातून त्यांनी तरुणांमध्ये एक नवी ऊर्जा आणि सामाजिक जाणीव निर्माण केली. डॉ. सप्तर्षी हे अच्युतराव पटवर्धन एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्या समाजवादी परंपरेत वाढले. महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे ते आयुष्यभर कट्टर अनुयायी राहिले. विविध आंदोलनांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागाने त्यांना ‘सत्याग्रही’ म्हणून ओळख लाभली.

 

डॉ. सप्तर्षी यांच्या लेखनाने आणि भाषणांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि साधेपणाने ते सर्वांचे आदर्श होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यातही ते कायम अग्रेसर असत. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. डॉ. सप्तर्षी यांच्या कुटुंबियांना, सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

नदीजोड प्रकल्पांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा-नदीजोड प्रकल्पातील कामे कालमर्यादा ठरवून करावीत- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अध्यक्षांना एक वर्षाची मुदतवाढ

औद्योगिक प्रयोजनासाठी अकृषिक सनदीची आवश्यकता नाही-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती · शासन परिपत्रक जारी ; उद्योग घटकांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

आतची मोठी बातमी- नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये १०:०२ मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले*             

रस्ते सुरक्षा जनजागृती ही एक राष्ट्रीय चळवळ असून, रस्ते वापरणाऱ्या सगळ्यांनीच जबाबादारीने वागण्याची अपेक्षा: रस्ते वाहतूक राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा

vishwatmaklokswamivarta

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प- व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड