vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरासह देशातील ७५ पुनर्विकसित स्थानके राष्ट्राला समर्पित

नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण..

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरासह देशातील ७५ पुनर्विकसित स्थानके राष्ट्राला समर्पित..

बुलढाणा, प्रतिनिधी: भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा १०.६३ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेला पुनर्विकास पूर्ण झाला असून, या अत्याधुनिक स्थानकाचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील ७५ पुनर्विकसित रेल्वे स्थानके राष्ट्राला समर्पित करण्यात आले.

नांदुरा रेल्वे स्थानकावर आयोजित मुख्य कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, नांदुरा नगराध्यक्ष मंगला मोरकर, माजी आमदार विजय शिंदे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील – मंत्री संजय सावकारे

यावेळी बोलताना वस्त्रोद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री संजय सावकारे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण झाले आहे. नवीन रेल्वेगाड्या, वंदे भारतसारख्या आधुनिक सेवा, डिजिटल तिकीट व्यवस्था आणि रेल्वे स्थानकांचा कायापालट यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर झाला आहे. नांदुरा स्थानकाच्या पुनर्विकासामुळे परिसरातील प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार असून रेल्वे क्रॉसिंगसह स्थानिक प्रश्नही लवकरच मार्गी लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.पाठपुराव्यामुळे नांदुराचा विकास – मंत्री आकाश फुंडकर

कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात रेल्वे विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. अमृत भारत स्टेशन योजनेत नांदुरा स्थानकाचा समावेश होण्यासाठी आमदार चैनसुख संचेती यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे नांदुरा स्थानकाला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. भविष्यात नांदुरा स्थानकावर लिफ्ट, स्वयंचलित जिने (एस्केलेटर) आणि अन्य प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितलेअत्याधुनिक सुविधांनी सज्ज स्थानक

 

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरा रेल्वे स्थानकात आधुनिक स्थानक इमारत, प्रशस्त आरक्षण कार्यालय, चार आरक्षण कक्ष, वातानुकूलित प्रतीक्षागृह, पुरुष, महिला व दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, नवीन प्रवेशद्वार, वाहनतळ, संरक्षक भिंत, आधुनिक प्रकाशयोजना, व्हिट्रिफाइड फरशी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टिकाऊ फर्निचर तसेच दृष्टीहीनांसाठी मार्गदर्शक पट्ट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

याशिवाय फलाट क्रमांक १ वर १६० मीटर आणि फलाट क्रमांक २ वर २२४ मीटर लांबीचे नवीन छत उभारण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी अडथळामुक्त प्रवेश, कमी उंचीचे आरक्षण कक्ष, विशेष प्रसाधनगृहे, राखीव वाहनतळ आणि आधुनिक दिशादर्शक फलकांमुळे स्थानक अधिक प्रवासी-केंद्रित आणि सर्वसमावेशक बनले आहे.

 

 

संबंधित पोस्ट

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…

राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत आयएफएमएस व ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरणखत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता वाढणा खतांच्या मागणीसाठी सोईचे ॲप उपलब्ध होणार

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

vishwatmaklokswamivarta