vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

हिंगोली जिल्ह्यातील 180 पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण- राज्यमंत्री मेघना बोर्डिकर

हिंगोली जिल्ह्यातील 180 पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण- राज्यमंत्री मेघना बोर्डिकर

 

राज्य प्रतिनिधी: हिंगोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या 616 पाणी पुरवठा योजनांपैकी 180 योजनांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.
सदस्य प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डिकर बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य एकनाथ खडसे, सदाशिव खोत, हेमंत पाटील यांनी सहभाग घेतला.
हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावातील पाणी पुरवठा योजना 1 कोटी 20 लाखाची होती असे सांगून राज्यमंत्री बोर्डिकर म्हणाल्या की, ही योजना 98 टक्के पुर्ण झाली असून यामध्ये काही त्रृटी आढळल्या आहेत. मुदतीमध्ये या त्रृटी दूर न केल्याने संबंधित ठेकेदारास 1 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील 190 योजनांची कामे 75 ते 99 टक्के झाली असून 131 योजनांची कामे 50 ते 75 टक्के झाली असल्याची माहितीही राज्यमंत्री बोर्डिकर यांनी सभागृहात दिली.
00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील क्रीडा आणि युवा विकास परिसंस्था बळकट करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ संपन्न ग्रामस्थांच्या सहभागाने सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबवावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलीआरगच्या बौद्ध विहार इमारतीची पाहणी…

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कार्यशाळेचे आयोजन

ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा By