vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शहरातील कुपोषीत माता बालकांनाही मिळणार पोषण आहार- महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

शहरातील कुपोषीत माता बालकांनाही मिळणार पोषण आहार- महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन पोषण आहार योजना राबवते. त्याच प्रमाणे आता शहरी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शहरातील मुलांनाही पोषण आहार योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तटकरे बोलत होत्या.  देशात कुपोषीत माता आणि कुपोषीत बालक यांना चौरस आहार मिळावा यासाठी केंद्र शासनातर्फे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवण्यात येत असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या की, अदिवासी भागातील कुपोषण यामुळे कमी झाले आहे. या चौरस आहाराच्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी अदिवासी विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसेच राज्यातील प्रत्येक गरोदर माता, बालक, स्तनदा माता यांना चौरस आहार मिळावा ही शासनाची भूमिका आहे. चौरस आहारामध्ये पुरवण्यात येणाऱ्या आहाराची वेळोवेळी तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्या आहारात काही त्रृटी आढळल्यास तो परत पाठवला जातो. तसेच कुपोषीत बालक, माता यांना पुरक आहारही पुरवण्यात येतो अशी माहिती मंत्री तटकरे यांनी सभागृहात दिली.

00p00000

संबंधित पोस्ट

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

जिल्हा कृषी महोत्सवाचे कराड येथे 26 ते 30 डिसेंबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta

ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी  नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्र सदनात सूर-संगम संगीतमय कार्यक्रम गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

vishwatmaklokswamivarta

नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta