
कमी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये आणि शेत मजुरांना 25 हजार रुपये देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे
राजकीय प्रतिनिधी-कमी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत, शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत, कर्जमाफी, पीकविमा, पाणी-चारा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह ९ मागण्या करण्यात आल्या आहेत.



