vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद..

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद..

(16 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता, शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबत संवाद.* आठही जिल्ह्यातील गरजू शेतकरी बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन.)

जालना, प्रतिनिधी  : मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील गरजू नागरिक आपल्या शेतातील जाण्या-येण्याच्या रस्त्याबाबत अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी गरजू नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे संवाद साधणार आहेत.

जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करावी, शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. अशी रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत. असे स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने गरजू शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांचे निराकरण करण्यासाठी विभागातील सर्व निवासी उप जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत सर्व गरजू शेतकऱ्यांशी या वेबिनारच्या माध्यमातून चर्चा आणि अडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा क्युआर कोडही प्रसिदध करण्यात येत आहे. गरजू नागरिकांना आपल्या मोबाईलव्दारे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. तरी विभागातील सर्व गरजू शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

शिवरस्ते, पाणंद रस्ते याबाबत संवाद

 

संबंधित पोस्ट

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद-सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक १७ जुलैला स्टील हब’च्या दिशेने रोडमॅपसह उद्योगवाढ, रोजगार आणि नवउद्योजकतेवर होणार सविस्तर चर्चा,उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

राज्यातील काही जिल्हयांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफच्या सतरा आणि एसडीआरएफच्या सहा पथकं सज्ज..

vishwatmaklokswamivarta

यळकोट यळकोट जय मल्‍हार…..!देवस्‍वारी, खंडोबाच्‍या पालखी पूजनाने #माळेगाव यात्रेस मोठया उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती· 2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात· गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक….

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप