vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराष्ट्रातील क्रीडा आणि युवा विकास परिसंस्था बळकट करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

महाराष्ट्रातील क्रीडा आणि युवा विकास परिसंस्था बळकट करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन…

राज्य प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील क्रीडा आणि युवा विकास परिसंस्था बळकट करण्यासाठीच्या व्यापक आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये, महाराष्ट्र राज्याला भारताच्या दीर्घकालीन क्रीडाविषयक महत्वाकांक्षांमध्ये योगदान देण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील एक आघाडीचे राज्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टासह संस्थात्मक सुधारणा, उत्तम कामगिरी करणारे क्रीडा प्रकार, क्रीडापटूंचा विकास तसेच प्रशासन या मुद्द्यांवर अधिक भर देण्यात आला.बैठकीमध्ये, राज्यात क्रीडापटूकेंद्रित, व्यावसायिकरीत्या व्यवस्थापित आणि भविष्यवेधी क्रीडा परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने विस्तृत सुधारणा कार्यक्रमाबाबत विचारविनिमय करण्यात आला. क्रीडा प्रशासनातील संस्थात्मक सुधारणा, उत्तम कामगिरी करणाऱ्या यंत्रणा बळकट करणे, संरचित सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षकांची क्षमता विकास, सुधारित क्रीडा विज्ञानविषयक पाठबळ, खेळाडूंच्या विकासाचे भक्कम मार्ग, लक्ष्यवेध मोहिमेला बळकटी, खेलो इंडिया केंद्रांचे सर्वसमावेशक मूल्यमापन, शाश्वत क्रीडाविषयक पायाभूत सुविधांचा विकास, क्रीडा सुविधांचे व्यावसायिक व्यवस्थापन, डिजिटलीकृत खेळाडू व्यवस्थापन यंत्रणा, खासगी क्षेत्राचा अधिक सहभाग, ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी आंतरराष्ट्रीय सहयोग, खेळाडूंची पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित प्रगती सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील स्पर्धा संरचनेत सुधारणा तसेच ‘प्रकल्प महादेव’साठीचा अंमलबजावणी आराखडा इत्यादी विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली.

तसेच यावेळी समर्पित संस्थात्मक यंत्रणा, वाढीव युवा सहभाग, नेतृत्व विकास आणि सर्व भागधारकांमध्ये अधिक समन्वय यांच्या माध्यमातून युवा व्यवहार परिसंस्था मजबूत करण्याच्या उपायांबाबत देखील उपस्थितांनी विचार मांडले.

बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना, रक्षा खडसे यांनी, खेलो भारत नीतीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यातील घनिष्ठ सहयोग अत्यावश्यक आहे यावर अधिक भर दिला. प्रस्तावित सुधारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संस्थात्मक सुधारणा, व्यावसयिक प्रशासन तसेच खेळाडूंच्या विकासासाठी सातत्यपूर्ण गुंतवणूक यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्राचे स्थान बळकट करण्याच्या संकल्पनेला पूरक ठरतील असे खडसे यांनी नमूद केले.

जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक क्रीडा परिसंस्था उभारण्याच्या तसेच राज्यभरातील खेळाडू आणि युवकांसाठी अधिक संधी निर्माण करण्याच्या व्यापक उद्दिष्टासह केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यातील निरंतर सहकार्याच्या माध्यमातून या सुधारणांना पुढे नेण्याच्या सामायिक कटिबद्धतेसह ही बैठक संपन्न झाली.

 

संबंधित पोस्ट

पाणीटंचाई निवारणासाठी मोताळा तालुक्यातील 15 गावांमध्ये 20 विंधण विहिरींना मंजुरी

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

अन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल व्हा- शेख महेमूद

हिंगोली जिल्ह्यातील 180 पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण- राज्यमंत्री मेघना बोर्डिकर

vishwatmaklokswamivarta

धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील धार्मिक स्थळांबाबत उच्चस्तरीय समितीमार्फत सुनावण्या सुरू -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरासह देशातील ७५ पुनर्विकसित स्थानके राष्ट्राला समर्पित