vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषद निवडणूक 2026 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषद निवडणूक 2026 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

 

नांदेड, प्रतिनिधी नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषद निवडणूक 2026 च्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनच्या बैठक हॉल येथे आयोजित करण्यात आले होते

प्रशिक्षण पथकाचे नोडल अधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या उपस्थितीत रेणुकादास देवणीकर यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबी, मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतदानाच्या दिवशीचे नियोजन तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने हे देखील उपस्थित होते.

या निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली असून, इतर मतदान अधिकारी म्हणून नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन देण्यात आले.

०००००

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देत 6 हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन.चैत्यभूमी येथेही ज्ञानस्मारकाची माहिती देणारा स्टॉलचैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रमाची ज्ञानस्मारकात थेट प्रक्षेपण व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात जिप्सीचा विशेष खेळ प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे शहर सर्वंकष गतीशीलता’ योजनेचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सुशासन दिन समारंभात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

💧 मुंबईसाठी दिलासादायक बातमी! वैतरणा धरण ९५% भरले, आणि हजारो क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.