vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता..

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता..

राज्य प्रतिनिधी-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 05 जून 2026 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 05 व 08 जून २०२६ या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या गोष्टी करा :विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

संबंधित पोस्ट

जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रम सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ•उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लिंकिंग केल्यास कठोर कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचा वेळेत व सुरळीत पुरवठा करण्याचे आदेश

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील- उद्योग मंत्री उदय सामंत,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण,एक्सपोर्ट पारितोषीक वितरण समारंभ साताऱ्यात होणार,उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर जनता दरबार भरविणार

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक तिकीट तपासणीची नवी परिभाषा रचण्याच्या उद्देशाने नमस्ते अभियानाचा प्रारंभ