vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

राज्य प्रतिनिधी-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची विभागीय आढावा बैठक प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे दिले.आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) योजनेची विभागीय आढावा बैठक आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात पार पडली.या बैठकीस पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्रीय व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक तसेच तृतीय पक्ष प्रशासक (टीपीए) प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व जिल्ह्यांनी आपल्या पालकमंत्र्यांची वेळ घेऊन योजनांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या. तसेच जिल्हा समन्वयक व क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून योजनांची माहिती द्यावी व सातत्याने समन्वय राखावा, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सर्व शासकीय रुग्णालयांनी अंगीकृत होऊन येणाऱ्या प्रत्येक पात्र रुग्णावर उपचार योजनेंतर्गतच करावेत, असे स्पष्ट करण्यात आले. अंगीकृत खासगी रुग्णालयांविषयी तक्रारी आढळल्यास संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० किंवा त्याहून अधिक खाटांची रुग्णालये अंगीकृत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले.

या बैठकीमुळे पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होऊन लाभार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व मोफत उपचार मिळण्यासाठी प्रशासन अधिक वेगाने कार्य करेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

ॲमेझॉनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून  राज्याच्या प्रगतीला हातभार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटरचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन..

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावणार ‘जयंती फलक’- मंत्री मंगल प्रभात लोढा…

vishwatmaklokswamivarta

देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन– केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

vishwatmaklokswamivarta

पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसरातील नुकसानीची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर