vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराष्ट्र सदनात जिप्सीचा विशेष खेळ प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र सदनात जिप्सीचा विशेष खेळ,

प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली, प्रतिनिधी : येथील महाराष्ट्र सदनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिप्सी या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाच्या विशेष खेळास चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील विशेष निवासी आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात जागरण ग्रुपच्या सहकार्याने जागरण फिल्म फेस्टिव्हल अंतर्गत जिप्सी या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांच्यासह सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे व स्मिता शेलार, दैनिक जागरण समूहाच्या प्राची पंडित, आयना कपूर आणि सऊद अहमद आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र सदन हे केवळ एक शासकीय विश्रामगृह न राहता, महाराष्ट्राच्या कला, संस्कृती, साहित्याच्या प्रसार व संवर्धनासाठी काम करणारे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र (कल्चरल हब) म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे, असे सांगून सिंघल म्हणाल्या, येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सर्व मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीचा कलाविष्कार अत्यंत समृद्ध असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

‘जिप्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शशी खंडारे यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला असून त्यात कबीर खंडारे यांनी ज्योतीया नावाच्या मुलाची मुख्य भूमिका साकारली आहे. जागरण फिल्म फेस्टिव्हल हा दैनिक जागरणचा उपक्रम असून ८ राज्ये आणि १४ शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

00000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत आयएफएमएस व ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरणखत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता वाढणा खतांच्या मागणीसाठी सोईचे ॲप उपलब्ध होणार

जिल्हा कारागृह अलिबाग येथे बंद्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा; समान हक्क व सन्मानावर भर

vishwatmaklokswamivarta

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी-महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मत्स्यव्यवसायिक श्री. शिवाजी कृ. पाटील यांची विशेष अतिथी म्हणून निवड…

vishwatmaklokswamivarta