vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मुंबईचे तापमान ३६.३ अंश

मुंबई : फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच थंडी गायब झाली असून तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबईत शनिवारी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. फेब्रुवारी महिन्यापासूनच नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत असून यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचे उच्चांक नोंदवले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील काही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामानात बदल होत आहे. अनेक भागातील किमान तापमानातही वाढ नोंदली जात आहे, तर कमाल तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ झाली असून याआधी दोनदा ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, शनिवारी उन्हाच्या झळा वाढून पारा ३६ अंशावर गेला. हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रात ३६. ३ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३४.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली, जे सामान्य तापमानाहून ४ अंशांनी अधिक होते. तर किमान तापमानातही वाढ झाली असून रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २३.६ तर सांताक्रूझ केंद्रात २२.४ किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे सकाळी जाणवणारा गारवा हळूहळू कमी होत आहे. दरम्यान, रविवारीही शहरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी  योजनेअंतर्गत 49 महसूली गावे घोषित करण्याबाबत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह, विश्रामगृह येथे कंत्राटी पदभरती

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” पुस्तिकेचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन