vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या**पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन*

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या**पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन*

 

सातारा प्रतिनिधी  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.

 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष राजू भोसले, सोनिया जयकुमार गोरे, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले, पोलीस बँड पथकामार्फतही विविध वाद्यांची धून वाजून स्वागत करण्यात आले.

 

नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

  प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

0000

संबंधित पोस्ट

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभागमहाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा मुंबईत ‘शून्य जिवीतहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री यांचे निर्देश

बांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत- अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध राहा – प्रशासनाचे आवाहन

वाहतूक बंदी अधिसूचना-उद्या दि 12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी…

देवाभाऊ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का?” डॉ. संजय लाखेपाटील

चिखली तालुक्यातील सवना येथे ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; नॅनो युरिया फवारणीचे मार्गदर्शन