vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

 

मुंबई प्रतिनिधी – कल्याण मधील चक्कीनाका येथील 12 वर्षांच्या अल्पवयीन निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून यातील दोषी आरोपींना कठोरता कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.आज कल्याण मधील चक्की नाका येथील बळीत मुलीच्या कुटुंबियांची ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची सांत्वनपर आर्थिक मदत लवकरच करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले.पीडित मुलीच्या कुटुंबाला राज्य सरकार तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.यावेळी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, पद्मश्री कल्पना सरोज , सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घिटे, आदी अनेक उपस्थित होते.

कल्याण मधील अवघ्या 12 वर्षांच्या निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करणारा नराधम गुन्हेगार असून परिसरात त्यांनी अनेक वाईट कृत्ये केली आहेत. चक्कीनाका या परिसरात धोकदायक इमारत असून या इमारतीचा वापर गुन्हेगार आरोपीने दुष्कृत्य करण्यासाठी केला आहे.मनपाने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारती मधील अनेकांनी घरे रिकामी केली असल्याने ही इमारत निर्जन झाली असून त्याचा वापर गुन्हेगार करीत होता.याच इमारतीत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या केली.त्यामुळे ही इमारत कल्याण डोंबिवली मनपा ने त्वरित तोडून टाकावी अशी मागणी बळी गेलेल्या मुलीच्या परिवाराने आणि स्थानिक रहिवासीयांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे करताच ना.आठवलेंनी के डी एम सी च्या आयुक्त इंद्रायणी जाखड यांना दृध्वनी करून संबंधित धोकादायक इमारत तपासून निष्कासित करण्याचे निर्देश दिले.

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या अत्याचाराच्या अमानुष घटना घडत असून समाजात माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या घटना रोखल्या पाहिजेत त्यासाठी सरकार पोलीस आणि जागृत सामाजिक कार्यकर्त्यांनी ही पुढे आले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

संबंधित पोस्ट

वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने महापारेषणला ‘पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-२०२५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न !

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..

जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची खात्री करण्याचे आवाहन

उरण टपाल कार्यालयासाठी जागेची मागणी-इच्छुकांनी 28 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन…