vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची खात्री करण्याचे आवाहन

जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची खात्री करण्याचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी:- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत दिल्याजाणाऱ्या जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशिष्ट पात्रता निकष लागू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10वीमध्ये किमान 60% तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी 70% गुण आवश्यक असल्याचे ‘महाज्योती’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी स्पष्ट केले. ‘महाज्योती’ कार्यालयास उपलब्ध असलेल्या निधीच्या मर्यादेनुसार आणि मा. संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार, प्राप्त अर्जांमधून गुणांच्या आधारे मेरीट लिस्ट तयार करून पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या योजनेसाठी नवीन अर्ज करण्यास इच्छुक विद्यार्थी तसेच आधीच अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्जात सुधारणा करण्यासाठी 20 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा किंवा नागपूर येथील केंद्रीय कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून अर्ज भरावा.

अर्ज प्रक्रियेविषयीच्या अधिक माहितीसाठी 0712-2870120 / 121 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही महाज्योती’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केले आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे – कंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करून बदनामी करणार्‍या‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’वर कारवाईची मागणी!अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून चौकशीचे आश्वासन!

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागात १०८ अनधिकृत हॉटेल आणि ८१ लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई- नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

सनबर्न’च्या माध्यमातून होणाऱ्या नशेखोरीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे झारीतील शुक्राचार्य शोधा !* – नशा विरोधी संघर्ष अभियानची मागणी 

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाचा ॲप- एसटी कुठपर्यंत पोहोचली, 15 ऑगस्टपासून आता मोबाईलवरच मिळणार जीपीएस लाइव्ह लोकेशन