vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी..

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी..

नवी दिल्ली प्रतिनिधी : मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.

21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. त्या निमित्ताने मराठी भाषा मंत्री श्री सामंत यांनी या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, समन्वयक डॉ. शैलेश पगारिया तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

येथे विविध महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार असणार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव असणार आहे. तर अतिविशिष्ट प्रवेशद्वाराला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यात आले. तसेच सभागृह क्रमांक एकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे, तर सभागृह दोनला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात येणार आहे. व्यासपीठाला स्व. काकासाहेब गाडगीळ आणि स्व. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची नावे असणार आहेत. 4000 व्यक्तींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व सभागृहात होणार आहे अशी माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना या पाहणी दौऱ्याच्या वेळी दिली.

पुणे येथून विशेष रेल्वे 19 तारखेला सुटणार आहे यामध्येही साहित्यविषयक परिसंवाद तसेच कवी संमेलनचे आयोजन होणार असल्याची माहिती श्री. नहार यांनी दिली. साहित्य संमेलनासाठी दिल्ली येथे होणारे नियोजन याचीही माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना दिली. महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण पाठबळ या साहित्य संमेलनाला असल्याचे मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

000

संबंधित पोस्ट

शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील- पणन मंत्री जयकुमार रावल

रायगड जिल्ह्यातील दिवाळी:-शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव…

vishwatmaklokswamivarta

सुरक्षित अन्नासाठी तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवा- संभाजी अडकुणे

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पर्जन्यमान) दि. ०८.०९.२०२५ (मि.मी.)सकाळी ८.०० वाजेपर्यंत

vishwatmaklokswamivarta

डीपी बोले तो.. डेमोक्रसी पार्टिसिपेशन” उपक्रम प्रशंसनीय – निवडणूक निरीक्षक जीवनेस्वीप समितीच्या ‘डीपी, स्टेटस व रिंगटोन’ उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta