vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेची बेकायदेशीर बांधकाम धडाकेबाज कारवाई सुरू घणसोली विभागात अतिक्रमण विरोधी कारवाई

नवी मुंबई महानगरपालिकेची बेकायदेशीर बांधकाम धडाकेबाज कारवाई सुरू घणसोली विभागात अतिक्रमण विरोधी कारवाई

 

       नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) श्री. भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने घणसोली विभागात निष्कासनाची कारवाई केली.

   नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोलीच्या कार्यक्षेत्रातील से.04 येथील सुशांत सुभाष थोरात, प्लॉट क्रमांक 277-278, सुशिलकुमार राधेश्याम बर्नवाल, प्लॉट क्रमांक- 280- 281, जितेंद्रकुमार बिंदेश्वरी प्रसाद, प्लॉट नं.282-283 व अमर चाळके, प्लॉट नं.284-285 या रो-हाऊस धारकांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, नमुंमपा मार्फत मंजूर बांधकामाच्या अतिरिक्त पुढील व मागील बाजूस अतिरिक्त आर.सी.सी., कॉलम उभारुन वाढीव बांधकाम केले होते.

सदर ठिकाणच्या वरील 04 रो-हाऊस धारकांच्या अनधिकृत वाढीव बांधकामांच्या कारवाईकरिता 01 जे.सी.बी., मशीन, 05 कामगार व 01 पिक अप व्हॅन यांच्या सहाय्य घेऊन ती बांधकामे निष्कासित करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील सहाय्यक अधिकारी संजय तायडे, कनिष्ठ अभियंता रोहित ठाकरे व अतिक्रमण विभागातील इतर कर्मचारी व तसेच पोलिस पथक तैनात होते.

   यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

शाळेच्या दर्शनी भागात शैक्षणिक शुल्का बाबत माहिती देणारे फलक सर्व शाळांनी लावावेत- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टिळकनगर सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणेशोत्सवाला दिली भेट*

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर” यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त 21 डिसेंबर रोजी खारघर येथे कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

जिल्ह्याची ७०.६६ टक्के मतदार गणनापत्र डिजिटायझेशन;• खामगाव विधानसभा मतदारसंघ अव्वल• गृहभेटीची मोहीम ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण