vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्त्रियांनी व्यावसायिक शिक्षण प्राप्त करुन समाजामध्ये मानाचे स्थान मिळवावे- न्या. श्रीमती. आर.एस. पाटील

स्त्रियांनी व्यावसायिक शिक्षण प्राप्त करुन समाजामध्ये मानाचे स्थान मिळवावे- न्या. श्रीमती. आर.एस. पाटील

 

        सांगली, प्रतिनिधी : स्त्रियांनी व्यावसायिक शिक्षण प्राप्त करुन समाजामध्ये मानाचे स्थान मिळवावे, असे प्रतिपादन ४थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती आर.एस. पाटील यांनी केले.

 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व भारती विद्यापीठ न्यु लॉ कॉलेज, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भारती विद्यापीठ न्यु लॉ कॉलेज सांगली येथे जागतिक महिला दिनानिमित्त विधी साक्षरता शिबीर निवृत्त न्यायाधीश अॅड. मुकुंद दाते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास भारती विद्यापीठ न्यु लॉ कॉलेज प्राचार्या डॉ. पुजा नरवाडकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनेल विधीज्ञ अॅड. मुक्ता दुबे, अॅड. धनंजय मद्वाण्णा उपस्थित होते.

   न्या. श्रीमती आर.एस. पाटील म्हणाल्या, स्त्रियांनी भारतीय राज्यघटनेने त्यांच्याकरीता निर्माण केलेल्या कायद्याचे पालन आपल्या संरक्षणासाठी करावे, त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांनी एकमेकास सहाय्य करावे व आपल्या हक्कांबद्दल जागरुक असावे.

अड. धनंजय मद्वाण्णा यांनी सायबर हल्ल्यांपासुन स्त्रियांनी आपले संरक्षण कशा प्रकारे करावे, कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.    शिबीरास महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

श्रम शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार – कामगार मंत्री ॲड. फुंडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमध्ये सामंजस्य करार

महाराष्ट्र दिनानिमित्त माधवबाग खराडी तर्फे मोफत यज्ञ चिकित्सा शिबिर

vishwatmaklokswamivarta

पारपत्र अर्जामध्ये दिलेल्या पत्त्याची चोख पडताळणी करणार-गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम

गोकुळ’चे ‘हलाल प्रमाणपत्र’ तत्काळ रद्द करा; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक*

vishwatmaklokswamivarta

भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेआणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट       

vishwatmaklokswamivarta