vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतमजूर युनियन लालबावटा यांचा विधवा व निराधार महिला यांच्या मागण्या साठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन चा मोर्चा …

 शेतमजूर युनियन लालबावटा यांचा विधवा व निराधार महिला यांच्या मागण्या साठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन चा मोर्चा …

 जालना प्रतिनिधी-

जिल्हा अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा च्या वतीने विधवा परित्यक्ता निराधार महीलांच्या हक्कासाठी अंबड चौफुली पासून मोर्चा काढण्यात आला,या मोर्चात जिल्हाभरातील विधवा परित्यक्ता निराधार महीला सहभागी झाल्या होत्या, मोर्चा ला मार्गदर्शन करताना डॉ. डी. एल. कराड यांनी सरकारच्या बजेट वर जोरदार टीका केली, या बजेट मध्ये गरीब शेतकरी शेतमजूर विधवा परित्यक्ता निराधार महीलांसाठी काही नाही केवळ श्रीमंतांना

मदत करणारे बजेट आहे, येणार्‍या काळात राज्य भरातील लाखो महीला घेऊन मंत्रालयाला घेराव घालून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ असे जाहीर आवाहन कॉम्रेड कराड यांनी केले.

 अनेक वर्षांपासून अत्यंत अपमानाचे व दारिद्र्याचे जगणे विधवा परित्यक्ता निराधार महीलांच्या वाट्याला आले आहे. हक्काचे मजबूत घर राहायला नाही, हाताला काम मिळत नाही, कामाचा यौग्य दाम मिळत नाही, महागाईने जगणेच मुश्किल केले आहे, कुटूबाचा उदरनिर्वाह करता येईल असे उत्पन्न नाही, सततचा दुष्काळ, दवाखाना, शिक्षणाचा खर्च, अश्या अनेक समस्या आम्हाला सोसाव्या लागतात, या सर्व महीलांच्या समस्या सोडविण्यासाठी खालील मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे काढण्यात आला

महीलांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या१) विधवा, परित्यक्ता, निराधार महीलांसाठी महागाईच्या प्रमाणात किमान ५००० हजार रुपये अर्थसहाय्य दरमहा वाटप करा.२) विधवा, परित्यक्ता, निराधार महीलांना केरळच्या धर्तीवर सात लाखाचे घरकुल वाटप करा.३) मनरेगाच्या सार्वजनिक कामात विधवा, परित्यक्ता, निराधार महीलांना प्राधान्य द्यावे.४) दोन मुलांच्या लग्नासाठी किमान प्रत्येकी ३ लाख रूपये अर्थसहाय्य मदत करा.५) विधवा परित्यक्ता निराधार महीलांच्या प्रत्येक पाल्याला बालसंगोपन यौजने अंतर्गत दरमहा ५ हजार रुपये दर महिन्याला सुरू करा.६) संजय गांधी श्रावण बाळ वयोवृद्ध विधवा परित्यक्ता निराधार महीलांसाठी उत्पन्नाची अट रद्द करा.७) विधवा परित्यक्ता निराधार महीलांसाठी घरासाठी जागा उपलब्ध करून द्या.८) विधवा, परित्यक्ता, निराधार, वयोवृद्ध यांना श्रावणबाळ, संजय गांधी या निराधार योजनेंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य मागील अनेक महीन्यापासून बंद आहे ते त्वरीत वाटप करा.९)श्रावणबाळ, संजय गांधी या निराधार योजनेंतर्गत मिळणारे अर्थसहाय्यासाठीचे बायोमेट्रिक नियम रद्द करून अर्थसहाय्य वाटप करा.१०)मौजे संकनपूरी ता. परतूर येथील मागील ६ महीन्यापासून बंद बडलेले अर्थ सहाय्य सुरू करू बंद करणार्‍या दोषींवर कारवाई करा.

या मोर्चाला मार्गदर्शन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉ. डि. एल.सिटू नेते अण्णा सावंत, शेतमजूर युनियन चे राज्य अध्यक्ष मारोती खंदारे, सरीता शर्मा, यांनी केले मोर्चा यशस्वी करण्यासाठी भगवान कोळे, शेख. फरीदा, मुक्ता शिंदे, शेख महेमुद, अर्चना कोरडे इत्यादी महीलांनी परीश्रम घेतले. अप्पर जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हा अध्यक्ष जालना.

संबंधित पोस्ट

तेल उद्योग कंपन्याचे संरक्षण क्षमता महोत्सवातून जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

आताची मोठी बातमी. कोकणातील, चिपळूण मध्ये पिंपळी कॅनॉल च्या पुलावर रीक्षा,थार आणि ट्रक अपघात एकूण चार ठार

विद्युत रोषणाई आपणास १८ ते २३ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत सायंकाळी ६:३० ते मध्यरात्री १२ पर्यंत पाहता येईल.

vishwatmaklokswamivarta

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनासाठी डायनींग टेबल दिले भेट *