vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपा जालना शहर व पतंजली योग समिती च्या वतीने शहरात विविध ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपा जालना शहर व पतंजली योग समिती च्या वतीने शहरात विविध ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन

 

जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जालना महानगर व पतंजली योग समिती जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जालना शहरातील विविध ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगाभ्यास केला.

या योग शिबिरांचे आयोजन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पतंजली यौव समिती जालना च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. ज्वाला लॉन्स, गोरक्षण पांजरापोळ मैदान, जुना जालना येथील मराठा सेवा संघ कार्यालय तसेच मौजपुरी येथे योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा सत्र घेण्यात आले. नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राउत, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, सरचिटणीस सुनील पवार, सभापती संध्या देठे, शिवप्रकाश चितळकर, अॅड.भगवान चांदोडे, अजित मानधानी, कल्याण भदनेकर, संजय पाखरे, सभापती पूनम स्वामी, आनंद झारखंडे, ऐश्रवर्या आडेकर, मनोज जोशी, शशिकांत घुगे, अमोल धानुरे, संजय डोंगरे, बद्रीनाथ भसांडे, राजाराम राजे जाधव, सुदर्शन काळे, अमन मित्तल आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य चांगले राहते. आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी योग अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक मान्यता मिळाली असून जगभरात योगाचे महत्त्व वाढत आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असेही त्यांनी सांगितले व या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पतंजली योग समितीचे पदाधिकारी, प्रशिक्षक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच सर्व सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळे हे योग शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

संबंधित पोस्ट

वेव्हज परिषद – २०२५-भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ (वेव्हज) चेप्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

बैलपोळ्यासह बुलढाण्यात झाला अनोखा “ट्रॅक्टर पोळा”!मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी; शेकडो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊन सणाला दिला आधुनिक रंग.

इनोव्हेशन’ लोकोपयोगी असावे – पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

कृषी यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण; कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

vishwatmaklokswamivarta