vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

राज्य प्रतिनिधी :- भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिम १६ मार्च २०२६ पासून सुरु आहे, नागरिकांकडे असलेल्या हस्तलिखितांची माहिती ज्ञानभारतम् या मोबाईल अॅपवर अपलोड करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारित होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. या हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था,संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खासगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतू ही हस्तलिखिते स्वखुशीने शासनाकडे सुपूर्द करावायाची झाल्यास शासन स्वीकारणार आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत, यामध्ये कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर क्लस्टर केंद्र, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे क्लस्टर केंद्र, आनंद आश्रम संस्थान, पुणे – स्वतंत्र केंद्र, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे स्वतंत्र केंद्राचा समावेश करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय तसेच अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था, तथा अभिजात मराठी भाषा कक्षा, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून कामकाज करणार आहेत.

या सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत “Gyan Bharatam” हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात ज्ञानभारतम् प्रकल्पासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे, तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेणे याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, तसेच एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

*****

संबंधित पोस्ट

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

कुणबी प्रमाणपत्रांच्या अडचणींसाठी सातारा जिल्हा प्रशासनाची हेल्पलाइन सुरू..

vishwatmaklokswamivarta

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

एमएसआरडीसी’च्या द्रुतगती महामार्गांमुळेराज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट; आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीनदिवसीय फळ महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta