vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत  मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत  मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश…

लातूर, I प्रतिनिधी: लातूर, बीड मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्य पदासाठी इच्छुकांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह अर्ज आरोग्य संकुल, दुसरा मजला उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ लातूर कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी, लातूर येथे व्यक्तीश: किंवा कार्यालयाच्या ddhslatur2008@yahoo.com व ddhsest12@rediffmail.com मेलवर सादर करावाअर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ०१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आहे. याबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन लातूरचे प्रभारी उपसंचालक डॉ. संजय ढगे यांनी केले आहे.

राज्य शासनाने राज्यातील १६ ठिकाणी मानसिक आरोग्य आढावा मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. लातूर परिमंडळांतर्गत लातूर मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी लातूर आणि नांदेड, बीड मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे.

*****

संबंधित पोस्ट

रूग्ण व नातेवाईकांची गैरसोय करणाऱ्यांवर कारवाई यंत्रणांना सौहार्दपूर्ण वर्तन करण्याचे निर्देश- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त #स्व-गणना करावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धारावीत संविधान वाचन व शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त धारावीत ज्येष्ठांसाठी माहिती संवाद संपन्न

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरु, गृहमंत्री अमित शाह यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती, ९ मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता.