vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

२४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंदयंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस..

२४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंदयंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस..

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात मान्सून सक्रिय असून यंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

सकाळी 11 वाजेपर्यंत दिलेल्या प्राप्त माहितीनुसार मागील २४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पाऊस झाला. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे.      त्याखालोखाल ठाणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ३७.२ मिमी, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ३२.४ मिमी, रत्नागिरी३७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या या समाधानकारक पावसामुळे मान्सूनची सक्रियता कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी अभियान उपयुक्त – आदिती तटकरे यांचे आवाहन,मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

अनुकंपा मेळाव्यातून नियुक्ती प्रक्रियेला गती*नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्यात येईल – जिल्हाधिकारी*

vishwatmaklokswamivarta

गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

जिल्ह्यात सेवा पंधरवडा प्रभावीपणे राबविणार- जिल्हाधिकारी आशिष येरेकर..

vishwatmaklokswamivarta