vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू, ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास-राज्यमंत्री माधुरी मिसाळoj

मुंबईतील वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू, ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांद्रा (पश्चिम) परिसरातील ५ हजार वृक्षांचे मूल्यांकन करण्यात येत असून, त्याचा अहवाल सहा महिन्यांत प्राप्त होणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानसभा सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, २०२६ च्या पावसाळ्यात सुमारे ताशी ८० ते ९० किमीपर्यंत वेगाने वारे वाहत आहेत. मुंबईचे भौगोलिक स्वरूप, दाट लोकवस्ती, भूमिगत सेवा वाहिन्या आणि विविध पायाभूत प्रकल्पांमुळे वृक्षांच्या मुळांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होऊ नये, यासाठी महानगरपालिका विशेष काळजी घेत आहे. तसेच वृक्षांमध्ये अंतर्गत कुज किंवा संरचनात्मक दोष आढळल्यास वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाते

या प्रकल्पासाठी “द स्माईल कॉन्सील” यांच्या माध्यमातून मे. ट्रीकोटेक एलएलपी या वृक्षतज्ज्ञ संस्थेची २१ मार्च २०२६ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. या मूल्यांकनामुळे धोकादायक वृक्षांची ओळख पटवून त्यांच्यावर वेळेत उपाययोजना करणे शक्य होणार आहेभूमिगत सेवा वाहिन्यांच्या नियोजनासाठी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावेळी डक्ट प्रणालीचा वापर करण्याचे प्रस्तावित असून, सेवा वाहिन्या टाकताना वृक्षांच्या मुळांना कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे

प्रायोगिक प्रकल्पाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कार्यपद्धती मुंबईतील इतर भागातही राबविण्याचे नियोजन असल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कार्यालयीन गतिमानता अभियानांतर्गत दशसूत्री कार्यक्रम- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

राज्यातील १९ महाविद्यालयांमध्ये १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर प्रवेशाकरीता-ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta