vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी- मंत्री उदय सामंत

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी- मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात 2019 पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार (कलम 58) आणि नवीन डीसीपीआर (कलम 35) अंतर्गत, गिरणीच्या जागेचे तीन सम भाग करून त्यातील एक तृतीयांश (वन थर्ड) जमीन महानगरपालिकेस बगीचे व क्रीडांगणासाठी, एक तृतीयांश गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि उर्वरित भाग मालकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या नियमाची मुंबईत अंमलबजावणी सुरू असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, या नियमानुसार आतापर्यंत 13,500 घरे बांधण्यात आली असून उर्वरित जमिनीवर काम सुरू आहे. खटाव मिलच्या संदर्भात, 10,228.69 चौरस मीटर जमीन मुंबई महापालिकेला मिळणार असून तितकीच जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरली जाईल. या जागेतून 900 ते 1000 नवीन घरे उभारली जातील.

जर काही मिल कंपाउंडने अद्याप वन थर्ड जमीन दिली नसेल, तर ती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत जागा उपलब्ध न झाल्यास ठाणे, वसई-विरार, परिसरातही कामगारांसाठी घरे देण्यात येतील, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा-विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

पाणलोट यात्रेस गोळेगावपासुन सुरुवात

vishwatmaklokswamivarta

खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद २३ नोव्हेंबर पर्यंत प्रदर्शनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta