vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला..

 राज्य प्रतिनिधी –

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जींद आणि सोनीपत ही शहरं आता हायड्रोजन रेल्वे🥰t तंत्रज्ञानाच्या इतिहासात कायम स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

 

🌿 १० डब्यांची, ३,२०० अश्वशक्तीची ही रेल्वे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन असून, तिच्यातून शून्य कार्बन उत्सर्जन होतं. ही भारताच्या तांत्रिक क्षमतेचं आणि हरित वाहतूक क्षेत्रातील नेतृत्वाचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

 

⚡ भारतीय रेल्वेचं जवळपास संपूर्ण विद्युतीकरण झाल्यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षितता अधिक मजबूत झाली असून, जागतिक इंधन पुरवठ्यातील अडचणींचाही रेल्वे सेवांवर परिणाम होणार नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 प्राप्त माहितीनुसार –

🏗️ हरियाणा दौऱ्यात पंतप्रधानांनी ₹१४,७०० कोटींहून अधिक किमतीच्या रस्ते, रेल्वे आणि आरोग्य क्षेत्रातील विकास प्रकल्पांचं उद्घाटन व भूमिपूजन केलं. तसेच प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या. स्वच्छ भारत अभियानातील हरियाणाच्या योगदानाचं त्यांनी कौतुक करत, जींद ही इतिहास, अभिमान आणि अध्यात्माची भूमी असल्याचं सांगितलं

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार — काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मुंबईत घोषणा.

vishwatmaklokswamivarta

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार- मंत्री प्रताप सरनाईक

सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना पशुपालकांपर्यंत पोहचवावी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

नवदुर्गा वृत्तमालिका भाग 7 कन्या सबलीकरणासाठी शिक्षणाच्या संधी अधिक बळकट

vishwatmaklokswamivarta

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष- गृहराज्यमंत्री योगेश कदम