vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नवदुर्गा वृत्तमालिका भाग 7 कन्या सबलीकरणासाठी शिक्षणाच्या संधी अधिक बळकट

नवदुर्गा वृत्तमालिका भाग 7 कन्या सबलीकरणासाठी शिक्षणाच्या संधी अधिक बळकट

सांगली, प्रतिनिधी : “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” या घोषवाक्याला खरी दिशा देत सांगली जिल्ह्यातील विविध विभागांतर्फे मुलींच्या शिक्षणावर भर दिला जात आहे. शालेय शिक्षणापासून ते क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकास, प्रवास सुविधा, पोषण आहार आणि स्वसंरक्षण अशा विविध उपक्रमांमुळे मुलींना शिक्षणाची संधी अधिक बळकट होत आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान योजना,जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा, खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीमधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीमधील उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. या योजनेचा २०२४-२५ मध्ये १,०८,६,८० मुलींनी लाभ घेतला आहे

प्राथमिक शिक्षण : मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश,इयत्ता पहिली ते आठवीमधील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा, खाजगी अनुदानित शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांना / सर्व मुलींना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात. लाभार्थी मुलींची संख्या १,०८,६,८० – आहे. तसेच, सर्व मुलींना प्रतिवर्षी दोन गणवेश आणि बूट, दोन जोडी पायमोजे वितरीत केले जातात. लाभार्थी मुलींची संख्या ५७,९,४७ आहे. पत्ता : – प्राथमिक शिक्षण् विभाग जिल्हा परिषद सांगली. माध्यमिक शिक्षण : कन्या सबलीकरणासाठी कराटे प्रशिक्षण माध्यमिक शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘कन्या सबलीकरण योजना’ राबवली जात आहे. ५०० पेक्षा अधिक मुलींची पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटेचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सन २०२५-२६ मध्ये तब्बल ४०,००० मुलींना या योजनेचा लाभ मिळणार असून मुली आत्मविश्वासाने कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतील. पत्ता : – माध्यमिक शिक्षण् विभाग जिल्हा परिषद सांगली

संबंधित पोस्ट

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगदगुरू तुकाराम महाराज पुरस्कार’  

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया 26 ऑक्टोबरपर्यंत सुरू

मृद नमुने तपासणी केंद्र सुरू करण्याकरीता मिळणार अनुदान युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य· मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील· अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

vishwatmaklokswamivarta