vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना

            पुणे प्रतिनिधी: चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधासंबंधी अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. याबाबत त्यांनी उद्योजकांना आश्वस्त केले आहे. यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

            उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याबाबत त्यांना आश्वस्त केले.वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश      या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. लवकरच सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन या समस्यांवर मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

0000

संबंधित पोस्ट

विविध कल्याणकारी उपक्रम, योजनांवर राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास 148 कोटी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता…

आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ – उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहुजन कल्याण विभागात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीचा नवा अध्याय युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,आयटीआय आणि टोयोटाच्या उभारलेल्या प्रयोगशाळांचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती संभाजीनगरसह नागपूर विभागातील अद्ययावत प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण,उद्योगांना पूरक प्रशिक्षण