vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

            मुंबई, प्रतिनिधी नव्या लोकायुक्त कायद्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरील दोन न्यायिक सदस्यांचा तसेच दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी समारंभ लोकभवन मुंबई येथे संपन्न झाला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सर्व सदस्यांना पदाची शपथ दिली.

            सर्वप्रथम राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे यांना महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या न्यायिक सदस्य पदाची शपथ दिली. त्यानंतर निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा किशोर केवले यांना लोकायुक्त संस्थेच्या दुसऱ्या न्यायिक सदस्य पदाची शपथ दिली.   सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता आणि राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना देखील यावेळी न्यायिक सदस्यांव्यतिरिक्त अन्य सदस्य म्हणून शपथ देण्यात आली.

 सर्व सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करतील, यापैकी आधी घडेल त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.

      शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

     सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व सदस्यांच्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरील नियुक्तीची राज्यपालांची अधिसूचना वाचून दाखवली.         शपथ ग्रहण सोहळ्याची सुरुवात ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता वंदे मातरम् व 0000

संबंधित पोस्ट

शिवकालीन वारसा पर्यटनाला मिळणार नवी ओळख**किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार* *प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*

महिला व बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

एस.एस.बी. पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी 10 डिसेंबरला मुलाखती …

vishwatmaklokswamivarta

मुंबईत गणेशोत्सव विसर्जनासाठी महानगरपालिकेची विशेष तयारी..

गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ वर्षांनिमित्तया महापूजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष महापूजा याच पार्श्वभूमीवर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महापूजा संपन्न