vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डाक अदालत 10 सप्टेंबरला

डाक अदालत 10 सप्टेंबरला

बुलडाणा, ( प्रतिनिधी : पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे बुधवार, दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आले आहे. पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे.

देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डरबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तक्रारीत तारीख आणि ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली त्याचे नाव आणि हुद्दा आदी संबधित माहिती डाक सेवेबाबत तक्रार डाकघर अधिक्षक गणेश आंभोरे, बुलडाणा विभाग, यांचे नावे दोन प्रतीत सोमवार, दि. 8 सप्टेंबर 2025 पर्यंत पोहचेल, अशा रीतीने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद-सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत –जिल्हाधिकारी किशन जावळे

श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा- सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधीजैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा आढावा…