vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

उत्कृष्ट छायाचित्रांना ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणार गौरव.! छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

उत्कृष्ट छायाचित्रांना ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणार गौरव.!

छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

ठाणे, प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्याचे सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने एक अनोखी ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’ आयोजित केली आहे. जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता, वन्यजीव, लोकजीवन आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हौशी,नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार आह

या स्पर्धेमध्ये 1) ‘वन्यजीव, 2) ‘निसर्ग, 3) ‘संस्कृती आणि परंपरा’ तसेच 4) ‘बदलते ठाणे आणि विकास प्रकल्प’ या चार विषयांवर आधारित छायाचित्रे स्वीकारली जातील. प्रत्येक छायाचित्रकाराला प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त 4 छायाचित्रे पाठवता येतील. ही छायाचित्रे उच्च दर्जाची (High-Resolution HD 10MB) असणे आवश्यक आहे. ही छायाचित्रे thanedio2025@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायची आहेत. छायाचित्रे सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2025, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांची निवड तज्ज्ञ समितीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रांना आकर्षक बक्षिसे आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून यातून निवडलेल्या अंतिम 100 छायाचित्रांना संबंधित छायाचित्रकाराच्या नावासह ठाणे जिल्ह्याच्या नियोजित ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान मिळेल. या स्पर्धेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आहे.

ही स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे-विभागीय आयुक्त डॉ. श्‍वेता सिंघल

vishwatmaklokswamivarta

लातुरात महा विधी सेवा शिबीर, शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,कायदेविषयक मदतीसोबतच शासनाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील-न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर• विविध शासकीय योजनांचे वितरण; जनजजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी• विविध योजनांविषयी भव्य प्रदर्शनी; लातूरकरांनी नोंदविला सहभाग

स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात* *- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर*

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणारअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

बोले तैसा चाले…!अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा१३३ कोटींच्या भव्य स्मारकास मंजुरी; डॉ. संजय लाखेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश..