vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

             सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यात नेत्रदान पंधरवड्यानिमित्त 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 40 वा नेत्रदान पंधरवडा राबविला जात असून याचे औचित्य साधून शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व नेत्रविभाग प्रमुख डॉ. शरद शेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे, एफ.एम.टी. चे विभाग प्रमुख डॉ. बरदाळे, नेत्र विभागाच्या डॉ. अर्चना कसबे व डॉ. गायत्री वडगावे, डॉ. प्रियांका राठी, डॉ. मोमिन आदि उपस्थित होते.

अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी नेत्रदान जनजागृतीसाठी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी जास्तीत जास्त नेत्र बुब्बुळ प्रत्यारोपण करण्याबाबत सूचित केले.

प्रास्ताविकात नेत्र विभाग प्रमुख डॉ. शरद शेगावकर यांनी सांगली जिल्ह्यात कार्यरत नेत्रपेढ्यांकडून 1296 नेत्रबुब्बुळे गेल्या 5 वर्षामध्ये गोळा करण्यात आली असून 761 नेत्रबुब्बुळांचे प्रत्यारोपण करण्यात आल्याचे सांगितले. त्याचबरोबर या नेत्रदान पंधरवड्यामध्ये पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकिय रुग्णालयामध्ये मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे यांनी समुपदेशन करुन 06 नेत्रबुब्बुळे गोळा केली व 15 लोकांचे बुब्बुळ प्रत्यारोपण करण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त नेत्रबुब्बुळे गोळा केल्याबददल अविनाश शिंदे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. स्वप्नाली बंडगर यांनी केले

संबंधित पोस्ट

राज्यात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून सर्व नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील वाशाळा येथे १०३ गरोदर मातांना मोफत सुकामेवा वाटप प्रतीक्षा झावर फाउंडेशन आणि ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचा कुपोषण निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम.

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची मोठी कामगिरी! दोन गुंतागुंतीच्या ओव्हेरियन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी! 

१०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील रक्तदाब व मधुमेह रुग्णांना मोफत औषध पुरवठा…

जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यात १०६७ रुग्णांना सुमारे ०८.२१ कोटींची मदत ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती