vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

१०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील रक्तदाब व मधुमेह रुग्णांना मोफत औषध पुरवठा…

१०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील रक्तदाब व मधुमेह रुग्णांना मोफत औषध पुरवठा…

आरोग्य प्रतिनिधी

-रायगड जिल्ह्यात उच्च रक्तदाबाचे ३४,०४७ तर २१,३९९ मधुमेह असे एकूण ५५,४४६ उच्च रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण आहेत. या रुग्णांची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषद सरसावली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत रुग्णांना ३ महिन्यांचा आवश्यक औषधांचा एन.सी.डी. कीट मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सोमवार (दि.३१) पासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. रुग्णांना एन.सी.डी. कीट उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत रुग्णांना एन.सी.डी. कीटचे वाटप करण्यात आले.

रायगड जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ३४ हजार २०० आहे. रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागात ५५ प्राथमिक आरोग्य केंद्र, २८० उपकेंद्र, ७ जिल्हा परिषद दवाखाने, ३ प्राथमिक आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उच्चरक्तदाब, मधुमेह आजारावरील औषधे देण्यात येतात. उपलब्धतेनुसार रुग्णांना औषधे देण्यात येत असल्याने, ही औषधे संपल्यानंतर दुर्गम भागातील काही रुग्णांना सतत आरोग्य केंद्रात येऊन औषधे नेणे अडचणीचे ठरते. यामुळे हे रुग्ण औषधांपासून वंचित राहून त्यांना इतर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

त्यामुळे जिल्हा परिषद सेस फंडातून नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत उच्चरक्तदाब, मधुमेह रुग्णांना एका वेळी तीन महिने पुरेल एवढा औषधसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील उच्च रक्तदाबाच्या ३४,०४७ तर मधुमेहाचे २१,३९९ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. रुग्णांना औषधांचे कीट सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

………………..

संबंधित पोस्ट

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जागतिक लोकसंख्या दिन : सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात .

आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत आरोग्य सेविकांचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान’ जोमाने ; राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी व मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची कटिबध्दता…गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची कटिबध्दता…गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची कटिबध्दता…