vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्याप्रदेश

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ३० पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांचा तसेच एकल विशेषता असलेल्या १० खाटांच्या रुग्णालयांचा एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पॅनलवर समावेशासाठी इच्छूक रुग्णालयांनी https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर ॲानलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्तात्रय बिरासदार यांनी केले आहे.या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील.पात्र एकल विशेषता १० खाटांचे रुग्णालये:

१. नाक, कान, घसा, नेत्रविकार, अस्थिव्यंग आणि पोलिट्रॉमा, भाजणे, बालरोग शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार युनिट्स, नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन युनिट्स, हिमोडायलिसिस मूत्रपिंडशास्त्र युनिट्स

योजनांचा उद्देश,आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची ही योजना देशभरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करते. यामध्ये १३५६ प्रकारच्या गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चाचा समावेश आहे.महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील पात्र लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देते. यामध्ये १३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे.

पात्रता निकष,३० पेक्षा जास्त खाटा असलेली रुग्णालये आणि वर नमूद केलेल्या विशेषता असलेली १० खाटांची एकल विशेषता रुग्णालये, जी राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य हमी सोसायटी निकषांची पूर्तता करतील, ती एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या पॅनलवर समावेशासाठी पात्र ठरतील. यामध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा यांचा समावेश आहे लाभः-पॅनलवरील रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतील. यामुळे गंभीर आजारांवरील उपचार परवडणारे होतील आणि रुग्णांचे आर्थिक भार कमी होईल

अर्ज प्रक्रियाः-रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळांवर ओनलाइन अर्ज करावा. तसेच, बुलढाणा जिल्हा रुग्णालय जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येईल.बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सर्व पात्र रुग्णालयांना, मग ते ३० पेक्षा जास्त खाटांचे असोत किंवा १० खाटांचे एकल विशेषला रुग्णालये असोत, एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी किंवा पॅनलवर समावेशासाठी, कृपया बुलढाणा जिल्हा रुग्णालय (भोंडे सरकार चौक, बुलढाणा, दूरध्वनी क्रमांक ७३०४५८८०१४ यावर संपर्क साधावा किंवा https://www.jeevandavee.gov.in वर भेट द्यावी.जिल्ह्यातील रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी स्वतः पात्रता तपासावी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्तळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकीस्तक तथा सदस्य सचिव जिल्हा तक्रार निवारण व सनियंत्रण समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

अति.वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन;जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची बैठक

करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता• दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीस मिळणार गती..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सचिन आडे पाटील

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू

शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित झालेल्या यश विद्यानिकेतन संस्थेवर कारवाई करण्यात येणार- शिक्षण मंत्री दादाजी भुसे· आरटीई प्रवेश प्रक्रियेत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसाय चालकांसाठी अन्न सुरक्षा मार्गदर्शक सूचना;सूचनांचे काटेकोर पालन करा-अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta