vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गतकारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गतकारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई प्रतिनिधी: ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलीविधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, एकनाथ खडसे यांनी ड्रग तस्करी संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस युनिट स्थापन करण्यात आले असून त्यात अधिकारी व अंमलदारांची नियुक्तीही केली आहे. जिल्हा स्तरावर समन्वय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहे. यात गेल्या दोन-अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मदतीने आता राज्यस्तरीय आणि आंतरराज्यीय समन्वय अधिक प्रभावी झाला आहे. सर्व राज्यांमध्ये ‘इंटेलिजन्स’ शेअरिंग सुरू असून त्यामुळे तस्करांवर एकत्रितपणे कारवाई शक्य झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्यसनमुक्तीसाठीची केंद्रे महत्त्वाची असून सध्या त्यांची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी योग्य धोरण तयार करून दर्जेदार व्यसनमुक्ती केंद्रांची उभारणी केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.bगांजाच्या शेतीवर बंदी असून ती मध्यप्रदेशातही कायदेशीर नाही, हे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाल

00000

संबंधित पोस्ट

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार…

vishwatmaklokswamivarta

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट-जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही

vishwatmaklokswamivarta

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन