vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

            मुंबई, ‍‍ प्रतिनिधी : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ सहाय्य मिळण्यासाठी दि. ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

   जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या निवडीनुसार व्यवसाय करण्यास अर्थ सहाय्य करण्यात येते. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी अनुदान उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० ऑगस्ट, २०२५ पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई कस्तुरबा क्रॉस रोड न. २, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावेत, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आ00000

संबंधित पोस्ट

नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात-ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा..

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता राज्यातील मासेमाऱ्यांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे…

टास्क फोर्सच्या अहवालानंतर सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाबाबत धोरण ठरणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू- शालेय शिक्षण विभागाची माहिती –

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta