जालना येथे महावितरण कंपनीकडून रोजच लाईट पाच पाच मिनिटाला जात असून त्यासाठी बाबासाहेब वानखेडे कुलस्वामी यांनी नायब तहसीलदार तायडे यांना निवेदन
जालना प्रतिनिधी: जालना शहरातील महाविद्युत वितरण कंपनीचे सर्वे क्र.४८८मधील असलेले ३३ के. व्ही.चे उपकेंद्र ११ केव्हीचे १३ फिडर असलेले व २ ग्रामिण फिडर व १ गावठाण फिडर असे एकुण ११ केव्हीचे १६ फिडर असल्यामुळे व मोतीबाग येथे ३३ केव्ही उपकेंद्रावर ११ केव्हीचे ४ फिडर असल्यामुळे सदर उपकेंद्र ओव्हरलोड होत आहे तसेच ११ केव्हीचे ट्रान्सफार्मर सुध्दा होव्हर लोड होत आहे त्यामुळे सदर ३३ केव्ही उपकेंद्राचे १३२ केव्हीमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रस्ताव मागवुन मंजुरी देणे बाबत. व सिरसवाडी येथे ३३ केव्ही उपकेंद्र उभारणे करीता प्रस्ताव मागवुन मंजुरी देणे बाबत. व १३२ केव्ही केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन देणे बाबत व ३३ केव्ही उपकेंद्र सिरसवाडी येथे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे बाबत.निवेदक : समस्त नागरीक, गावकरी व शेतकरी, जेष्ठ नागरीक विज ग्राहक, आरोग्य विभाग डॉक्टर, वकील व्यापारी उद्योजक, दुकानदार, हॉटेल व्यवसायीक.
, सर्व सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताकरीता आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की, जालना शहरात एम.आय.डी.सी. १३२ केव्ही केंद्रातून मोतीबाग व सर्वे क्र.४८८ येथील ३३ केव्ही उपकेंद्रास विद्युत पुरवठा केला जातो. परंतु या फिडरवर 99 केव्हीचे १३ फिडर असलेले व २ ग्रामिण फिडर व १ गावठाण फिडर असे एकुण ११ केव्हीचे १६ फिडर असल्यामुळे व मोतीबाग येथे ३३ केव्ही उपकेंद्रावर ११ केव्हीचे ४ फिडर असल्यामुळे सदरील १३२ केव्ही सब स्टेशन मधुन ३३ केव्ही उपकेंद्रांना विद्युत पुरवठा आहे परंतु १३२ केव्ही उपकेंद्रवरुन ओव्हरलोड झाले
की हे फिडर ट्रिप होते. व सर्व फिडर बंद पडतात महाविद्युत वितरण कंपनीचे विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे विद्युत पुरवठ्याचे खुप मोठे नुकसान होते. तसेच सदरील बाब सर्वे क्र. ४८८ मधील ३३ केव्ही उपकेंद्रामध्ये १० एम. व्ही. चे पॉवर ट्रान्सफार्मर २ आहे. ५ एम. व्ही.चे १ आहे सदरील या सबस्टेशनवर ३३ केव्ही. उपकेंद्रातुन फिडर ११ केव्हीचे राममंदिर, सॅटेलाईट, समर्थ नगर, टिव्ही सेंटर, योगेश नगर, मेडीकल कॉम्प्लेक्स, मेडीकल एक्सप्रेस, रेल्वे एक्सप्रेस, कलेक्टर ऑफिस, कलेक्टर बंगलो, कृषि वाहिनी -२, यामध्ये ११ केव्हीचे दरेगाव, सिरसवाडी, पिरपिंपळगाव हे ११ केव्हीचे फिडर व ट्रान्सफार्मर सुध्दा ओव्हरलोड झाले की ट्रिप होते व ट्रिप झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होतो. तसेच मोतीबाग येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे गोकुळनगरी, दुःखी नगर, बचत भवन, शनी मंदिर हे फिडर सुध्दा ओव्हरलोड होत असल्यामुळे अनेकवेळा ट्रिप होत आहे. त्यामुळे नागरीकांना विद्युत पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. व विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे महावितरणचे लाखो रुपयाचे नुकसान होते. याचा विचार करणे गरजेचे आहे. शासनाने उर्जा मंत्री यांनी रु.३०० कोटी रुपये शहरासाठी दिले परंतु सिस्टीमच ओव्हरलोड आहे त्यासाठी त्या पैशाची उधळपट्टी इकडे तिकडे करुन विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना पाणी देण्यास दाऱ्यातून अनेकवेळा चकरा मारुन लाईट ये जा करते तसेच इंदेवाडी अअंतरवाला, सामनगाव, लक्ष्मीकांत नगर, दरेगाव, हे ११ केव्हीचे फिडर सुध्दा ओव्हरलोड झालेले आहे. यामुळे वेळोवेळी सदरील फिडर ट्रिप झाल्यावर यंत्र चालकांना ये जा चालुबंद करण्यासाठी चकरा माराव्या लागतात. विद्युत कंपनीचे विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे नुकसान सुध्दा होते. सदरील ओव्हरलोड फिडर याचे विभाजन करुन सिरसवाडी येथे ३३ केव्ही उपकेंद्र उभारण्या करीता प्रस्ताव मागविण्यात यावा व मंजुरी देण्यात यावी. व सर्वे क्र. ४८८ मधील ३३ केव्ही उपकेंद्राचे १३२ केव्ही केंद्रामध्ये रूपांतर करण्यात यावे. जेणेकरून सदरचे केंद्र व फिडर हे ओव्हरलोड होणार नाही. लाईट ये जाकरणे बंद होईल. तसेच एच.टी. लाईन व एल.टी. लाईनच्या तारा खुप जुन्या झालेल्या असल्यामुळे त्या बदलण्या करीता प्रस्ताव मागवुन मंजुरी देण्यात यावी.तसेच १३२ केव्ही सबस्टेशन साठी सर्वे क्र. ४८८ मध्ये शासनाने जागाउपलब्ध करुन देण्याची कृपा करावी व महाविद्युत वितरण कंपनी व पारेशन कंपनीने १३२ केव्ही सबस्टेशन उभारण्यासाठी प्रस्ताव मागवुन मंजुरी देण्यात यावी. तसेच सिरसवाडी येथे ३३ केव्ही उपकेंद्रासाठी गायरान जमीन असलेली जागा उपलब्ध करुन द्यावी व प्रस्ताव मागवुन मंजुरी द्यावी जेणेकरुन नागरीकांचे व विज ग्राहकांचे, शासकीय निमशासकीय कार्यालय, आरोग्य विभाग, सॅटेलाईझरचे, शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही महावितरणचे नुकसान होणार नाही.तरी मायबाप सरकारने वरील समस्या जाणुन शेतकरी व नागरीकांना व ग्राहकांना न्याय द्यावा व संबंधीत विभागांना आदेश देण्याची कृपा करावी.