vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद

दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद

 

रायगड-अलिबाग,( प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग दि. 24 व 25 जून 2026 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी दिले आहेत.

दि. 23 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे महादरवाजा जवळील पायरी मार्गावर दरड कोसळून मार्ग बंद झाला आहे. संबंधित विभागाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, हे काम पूर्ण होईपर्यंत पर्यटकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तहसीलदार महाड यांनी केलेल्या विनंतीनुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांना नाणे दरवाजा, चित्त दरवाजा तसेच किल्ले रायगड परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने पर्यटकांना या कालावधीत पायरी मार्गाचा वापर न करण्याचे आवाहन केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51, 54 व 56 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

००००

संबंधित पोस्ट

आचारसंहिता क्षेत्रातील ७६ जणांना २४ तासांत शस्त्र जमा करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जागतिक बंदरे आणि जहाज परिषदेत महाराष्ट्राच्या सागरी विकासाची दिशा

vishwatmaklokswamivarta

कुकडी डावा कालवा नूतनीकरणासाठी ४७ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यताविधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा

सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रवाहित   — जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर-श्री गुरु तेग बहादुर साहिबजी समागम कार्यक्रमाच्या प्रसारासाठी-जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लुएंसर यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी नवे नियम लागू

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड  

vishwatmaklokswamivarta