vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील* 

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील*

सातारा प्रतिनिधी: हर घर तिरंगा हे अभियान सातारा जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध घटकांनी उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे अभियान राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे

  जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय संस्था, महामंडळे, शासकीय व खाजगी इस्पीतळे व सार्वजनिक आस्थापना व खाजगी आस्थापनांची कार्यालये, कारखाने व दुकाने इत्यादी ठिकाणी तीन दिवसाच्या कालावधीत राष्ट्रध्वज यथोचित सन्मानाने फडकवण्यात यावा.

राष्ट्रध्वज सन्मानाने फडकविताना राष्ट्रगीत व राज्यगीत गावून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात यावी. तसेच राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. दि. १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ या दरम्यान सुर्योदयानंतर राष्ट्रध्वज फडकवणे व सुर्यास्तापुर्वी राष्ट्रध्वज उतरविणे बंधनकारक राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रीय सन्मान हा प्रत्येक देशभक्ताची भावना त्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्याबाबतचा शासकीय ठराव पावसाळी अधिवेशनात पारित करावाआमदार सुधीर मुनगंटीवार यांची राज्य शासनाकडे मागणी

महापौर सौ.सुजाता पाटील यांनी घेतला घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील जलस्थितीचा आढावा

थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50 टक्के सवलतीची अभय योजना जाहीर…

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मधुमित्र-मधुसखी पुरस्कार जाहीर ज्ञानेश्वर मलीले,गणेश बुरकुल, राजेंद्रदास बैरागी, श्वेता वायाळ यांना पुरस्कार

पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च करून भारताने पाकिस्तान मधील दहशतवाद्यांच्या खात्मा केल्यामुळे भाजपा जालना च्या वतीने जल्लोष..

थंडी आणि अंधारापूर्वीच मतदानाचा हक्क बजावावा;ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिकारी अशीमा मित्तल यांचे आवाहन• हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन• 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 कालावधीत होणार मतदान• मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

vishwatmaklokswamivarta